पूर्ववैमनस्यातून चहाच्या टपरीवाल्याला मारहाण

पिंपरी – जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी चहाच्या टपरीवाल्याला बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना वाकड येथे इंदिरा कॉलेज जवळ शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास घडली.

शंकर माने, अतुल शितोळे, पप्पु कबाडे अशी तीन आरोपींची नावे असून यातील माने व कबाडे अटक असून शितोळे फरार आहे. तीनही आरोपी शनी मंदिर जवळ वाकड येथील राहणारे आहेत. या प्रकरणी अरुण विठ्ठल आखाडे (वय 35 रा. इंदिरा कॉलेजजवळ, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

कबाडे, शितोळे व माने हे दुचाकीवरून आले व त्यांनी तू पोलिसात आमची तक्रार करतो का असे म्हणत विट व लोखंडी रॉड आखाडे यांच्या डोक्‍यात घातली. यावेळी घरातील भाऊ, आई व मुले सोडविण्यास आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. आखाडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. त्याचाच राग मनात धरून माने, कबाडे व शितोळे यांनी आखाडे यांना मारले. याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात तीनही आरोपींवर मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)