पुणे- पुर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीमध्ये एक दिवस वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला अहे.
सुशांत रमेश ओंबळे (वय 24, रा. कोथरूड, मुळ रा. विठ्ठलवाडी, ता. मुळशी), प्रशांत रमेश ओंबळे (वय 25, रा. कोथरूड, मुळ रा. विठ्ठलवाडी), महेश ऊर्फ सागर मुकुंद मिस्त्री (वय 29, रा. कोथरूड) अशी पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अक्षय बाळु जोरी (वय 22, रा. कोथरूड) असे मयताचे नाव आहे. याबाबत बाळु सिताराम जोरी (वय 48, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली. ही घटना 10 जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली.
मयत अक्षय आणि सुशांत हे मित्र होते. सुमारे दोन वर्षापुर्वी सुशांत आणि प्रेयसीविषयीची माहिती अक्षय याने तिच्या घरी सांगितली. त्यावेळी अक्षय आणि सुशांत यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर 9 जुलै 2018 रोजी पुन्हा त्याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. पुन्हा वाद मिटला. त्यावेळी ते दोघे आणि त्यांचे इतर मित्र दारू पार्टी करत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर सुशांत ओंबाळे, प्रशांत ओंबाळे आणि सागर मेस्त्री यांनी बिअरची बाटली अक्षय याच्या गळ्यात खूपसून त्याचा खून केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी पुन्हा तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलानी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)