पूर्वग्रह दूषित ठेवून निर्णय घेवू नका

दिलीप वळसे पाटील : आळंदीत शिक्षण संस्थेचे राज्यस्तरीय अधिवेशनाची सांगता

आळंदी- शिक्षण संस्था व सहकारी संस्था यांच्याविषयी पूर्वग्रह दूषित ठेवून कोणतेही निर्णय घेऊ नये तसेच नवीन धोरणेही जास्त घातक आहेत. संस्था संस्थाचालक शिक्षक विद्यार्थी यांना संकटातून बाहेर काढण्या बद्दल व शैक्षणिक संस्थांचे प्रश्‍न व समस्या सरकारसमोर मांडण्याच्या कामाचे आश्‍वासन विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आंबेगाव तालुक्‍याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
महाराष्ट्राची अध्यात्म पंढरीमध्ये संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पावन भूमी आळंदी नगरीत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे 24 वे राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी दिलीप वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी विजय नवल पाटील, माजी खासदार अशोक मोहोळ, आळंदी नगरपरिषदेच्या अध्यक्षा वैजयंता कांबळे, ऍड. विजय गव्हाणे, सुरेश वडगांवकर, गणपतराव बालवडकर, तुकाराम गुजर, अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विशस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, बबनराव कुऱ्हाडे, नंदकुमार मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण देऊन शिक्षणाचा विस्तार वाढवण्याचे काम हे सर्व शिक्षण प्रणाली करत असताना त्यामध्ये सरकारची भूमिका व कर्त्यव्यव असते याची सरकारला जाणीव व्हावी असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये शांतिब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सागर देशपांडे यांनी बदलती शिक्षण पद्धती व संस्थाचालकांची भूमिका या विषयावर व्याख्यान केले. त्यानंतर श्री ज्ञानेश्‍वर महाराज देवसंस्थाचे प्रमुख विश्‍वस्त विकास ढगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. दीपक पाटील यांनी शिक्षण संस्थांमध्ये सौर ऊर्जेचा वापर या विषयावर व्याख्यान केले. दरम्यान, समारोपाप्रसंगी दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री ज्ञानेश्‍वर देवस्थानकडून श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आळंदी यांना भेट दिलेल्या मिनरल वाटर प्लांटचे उद्‌घाटन करण्यात आले. अधिवेशन यशस्वी पूर्ण करण्यामध्ये संस्थेचे सचिव अजित सुरेश वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विश्‍वस्त लक्ष्मणजी घुंडरे, प्रकाश काळे, सर्व पदाधिकारी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)