पूर्णानगरला रंगणार स्वरसागर संगीत महोत्सव

पिंपरी- महापालिकेच्या वतीने पूर्णानगर येथील शनी मंदिराशेजारील मैदानावर 1 ते 4 फेब्रुवारीला स्वरसागर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वरसागर संगीत महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवार (दि.1) सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यामध्ये नंदेश उमाप यांचा लोकरंग आणि सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम सादर होणार आहे.

शुक्रवार (दि.2) सायंकाळी 6 वाजता पंडित राकेश चौरसिया यांचे बासरीवादन, त्यानंतर पद्मश्री सुरेश तळवळकर यांच्या टीमचा यात्रा हा कार्यक्रम सादर होईल. शनिवार (दि.3) पोरबावन चॅटर्जी यांचे सातारवादन होणार आहे. तर रविवारी (दि.4) सायंकाळी 6 वाजता महेश काळे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून शहरातील सर्व नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)