पूराच्या पाण्यात महिला गेली वाहून

बीड – तालुक्‍यातील बेलखंडी पाटोदा येथे शेतातून परतणारी महिला चार शेळ्यांसह पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
अन्नपूर्णा सखाराम माने (रा. बेलखंडी पाटोदा) असे त्या महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, 45 वर्षीय अन्नपूर्णा नित्याप्रमाणे रविवारी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. दुपारी साडेचार वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्या शेळ्या घेऊन घराकडे परतत होत्या. बिंदुसरा नदीच्या पुलालगत पाणी आले होते. पूल ओलांडता येईल, असा त्यांना विश्वास होता; परंतु त्या पुलाच्या मधोमध आल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. परिणामी चार शेळ्या व अण्णपूर्णा माने या पुरात वाहून गेल्या. दरम्यान, यावेळी शेतातून इतर शेतकरीही परतत होते.

पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्यांना अण्णपूर्णा यांना पाण्यातून बाहेर काढता आले नाही. साधारण एक किमीपर्यंत त्या वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनाची माहीती कळवल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीहीमदत अथवा प्रशासन मदतीसाठी पोहोचले नव्हते असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)