पूरसंरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करा

बीड – शहराच्या मध्यातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीमूळे भविष्यात पूरपरिस्थीतीला सामोरे जावे लागणार आहे. पूर्वनियोजन म्हणून पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करावा अशा सूचना आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह,नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकीत्स्क डॉ.आशोक थोरात, मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सययद,न.प.चे अभियंता सतीश दंडे उपस्थित होते. याप्रंसगी आ.क्षीरसागर म्हणाले की, जिल्हा रुग्णालयास मंजूर झालेल्या नवीन 300 खाटाचे प्रस्तावित बांधकाम हे जागेच्या हस्तांतरन प्रक्रियेमुळे प्रलंबित पडले आहे ते तात्काळ निकाली काढण्यात यावे.

बांधकामासाठी निधी उपलब्ध असतानाही केवळ जागेच्या हस्तांतरन प्रक्रीयेमूळे या कामाच्या निवीदा काढण्यासाठी विलंब होत आहे. शहरातील खराब झालेल्या रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. अचानक उदभवलेल्या संकटामूळे रहदारीला होणारे अडथळे दूर व्हावेत व शहराचे दळवळन सूरळीत राहावे यासाठी पर्यायी व्यवस्था हाताशी असावी म्हनून बींदूसरा नदीवर खासबाग देवी मंदिर ते मोमीनपूरा या नवीन पूलाच्या कामाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने पंधरा दिवसाच्या आत तातडीने देण्यात यावा.त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोक्‍याच्या पडून असलेल्या जूनी तहसील व जूने शहर पोलीस स्टेशनची जागा न.प. ला बचत भवन उभारणीसाठी हस्तांतरीत करावी.शासकीय धाण्यसाठविण्यासाठी असलेल्या गोडाउनची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. त्यामुळे जूने गोडाउन पाडून नवीन गोडाउन उभारणीसाठीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा. या आढावा बैठकीप्रसंगी शहरातील प्रलंबित विविध कामांचाही आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)