पूना हॉस्पिटल डॉक्‍टराची गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्‍यातून संपविले जीवन : सुसाईड नोट सापडली

पुणे- एका ज्येष्ठ दंत वैद्यकीय तज्ज्ञाने खासगी हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील दहा ते बारा वर्षांपासून ते या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. तसेच त्यांचे नाना पेठेत स्वत:चे क्‍लिनिकही आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डॉ. शशिकांत उत्तमचंद बंब ( 63, रा. प्रेमनगर) असे आत्महत्या केलेल्या या डेंटिस्टचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी पूना हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी म्हणाले, बंब हे पूना हॉस्पिटलमध्ये दंत वैद्यकीय तज्ञ म्हणून काम करतात. ते दररोज दोन ते तीन तास तेथे असतात. यानंतर ते नाना पेठेतील त्यांच्या खासगी क्‍लिनिकमध्ये असतात. सोमवारी सकाळी रुग्णालयातील झाडूकाम करणारी कर्मचारी त्यांच्या केबिनमध्ये साफ-सफाईसाठी आली होती. यावेळी तीला केबीन आतून लावलेली आढळली. दरवाजा ठोकावूनही तो उघडला गेला नाही. यामुळे तिने तेथील कर्मचाऱ्यांसा सांगितले. तेथील कर्मचाऱ्यांनी दरवाजा ढकलून उघडला असता त्यांना बंब हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी बंब यांच्या जवळ सुसाईड नोट आढळली. यामध्ये त्यांनी “आपल्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये’ असे म्हटले आहे. त्यांच्या मागे एक मुलगा असून तो हिंजवडी येथे खासगी कंपनीत कामाला आहे, तर मुलगीचा विवाह झाला असून ती अहमदाबाद येथे रहाते. तर पत्नी घरीच असते. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सहा भाऊ होते. यासर्वांचा मृत्यू झाला आहे. यातील एका भावाचा व त्याच्या मुलाचाही नुकताच मृत्यू झाला. यामुळे त्यांना कदाचित धक्का बसला असावा तर मित्र मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार ते आर्थिक अडचीत होते. पोलीस ही दोन्ही कारणे तपासून पहात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)