पूनावाला क्‍लीन सिटी मॅरेथॉन 18 नोव्हेंबर रोजी रंगणार

पुणे रनिंग बियॉंड मायसेल्फतर्फे आयोजन
पदकांचे, मॅरेथॉन टी शर्टचे अनावरण, नाव नोंदणीला प्रारंभ

पुणे: पुणे रनिंग बियॉंड मायसेल्फ व अदर पूनावाला क्‍लीन सिटी इनिशिएटिव्हच्या (एपीसीसीआय) साथीने पूनावाला क्‍लीन सिटी मॅरेथॉनचे (पीसीसीएम) रविवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सगळ्यात मोठा धावण्याचा उपक्रम ठरलेल्या या मॅरेथॉनला पीआरबीएम आणि एपीसीसीआयने पाठबळ दिले आहे.

-Ads-

नागरिकांना आरोग्यदायी आणि अधिक फिट ठेवणारी जीवनपद्धती अंगिकारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्वच्छ आणि हरित शहराच्या गरजेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. या घोषणेसोबतच पीआरबीएम आणि एपीसीसीआयतर्फे मॅरेथॉन टी शर्ट व विजेत्यांच्या पदकांचे अनावरण करण्यात आले. ही मॅरेथॉन बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स येथून सुरू होऊन बाणेर रोडहून पुणे विद्यापीठ जंक्‍शनला येईल.

स्वच्छ आणि हरित शहराच्या मुद्दयावर भर देत या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना रहदारीचे सुरक्षा नियम प्रामाणिकपणे पाळण्याचे आवाहन करत त्यातून पुणे ट्रॅफिक पोलिसांना पाठिंबा दिला जाणार आहे. या मॅरेथॉनमध्ये टीच फॉर इंडिया, इशा विद्या, मुस्कान, बापू ट्रस्ट, लोक बिरादरी प्रकल्प आणि मुक्तांगण मित्र अशा विविध समाजोपयोगी कामांना आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून समोर आणले जाणार आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्यांना या संस्थांना देणगी देण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक अदर पूनावाला यावेळी म्हणाले की, आपली शहरे अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी बनवण्याची आवश्‍यकता आधी कधीच इतकी भासली नव्हती. या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून एपीसीसीआयने पीआरबीएमसोबतच्या सहकार्यातून समाजाने एकत्र येण्याची आणि त्यातून अधिक आरोग्यपूर्ण शहरे उभारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पूनावाला क्‍लीन सिटी मॅरेथॉनच्या माध्यमातून या संदेशाची व्यापकता आम्हाला वाढवायची आहे आणि नागरिकांना अधिक सक्रिय जीवनशैली अंगिकारण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांना निमंत्रित करत आहे.

नोंदणी केलेल्या सर्व सहभागींना टीशर्ट, नाव असलेले रनर्स बिब, पूर्ण केल्याचे मेडल, सकाळचा नाश्‍ता आणि 1500/- रुपयांच्या पेटीएम कॅश बॅक व्हाऊचर्ससह गूडीबॅग मिळणार आहे. पुण्यातील कोणत्याही कोटक बॅंक शाखेत या रनसाठी नोंदणी करणाऱ्या सहभागींना कोटक बॅंक आणि पीआरबीएचे को-ब्रॅंडेड डेबिट कार्ड आणि पुणेरी पर्क्‍सचे 22,500 रुपयांहून अधिक किंमतीचे व्हाऊचर्स मिळतील.

सहभागींना खालील विभागांसाठी इथे नोंदणी करता येईल:
1.फन रन 6 किमी.
2.10 किमी रन- टायमिंग चीपसह
3.21.1 किमी हाफ मॅरेथॉन- टायमिंग चिपसह
4.42.2 किमी फुल मॅरेथॉन- टायमिंग चिपसह

या उपक्रमाला महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे प्रमाणन लाभले आहे आणि हा मार्ग असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स ऍण्ड डिस्टन्स रेसेसने प्रमाणित केला आहे. या कार्यक्रमातील टायमिंग सर्टिफिकेट्‌सचा वापर सहभागींना देशभरातील विविध कार्यक्रमांमध्ये नोंदणीसाठी करता येईल. पुणे रनिंग स्पोर्टस्‌ फाऊंडेशनची मूळ संकल्पना असलेल्या पीआरबीएमला टायटल स्पॉन्सर म्हणून अदर पूनावाला क्‍लीन सिटी इनिशिएटिव्हचे सहकार्य आहे. फोक्‍सवॅगनचे पाठबळ लाभलेल्या या उपक्रमाचे पेटीएम शॉपिंग पार्टनर, कोटक महिंद्रा बॅंक बॅंकिंग पार्टनर, वीकफिल्ड फूड पार्टनर, एचआरएक्‍स बाय हृतिक रोशन ऍपरल पार्टनर, क्‍लब महिंद्रा हॉलिडे पार्टनर, इसोबार कॉर्पोरेट पार्टनर आणि कॅप्शन्स आऊटडोअर पार्टनर आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)