पूनम यादव वर वाराणसीत हल्ला

वाराणसी – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टींग मध्ये सुवर्णपदक मिळवणारी पूनम यादव हिच्यावर काही अज्ञात इसमांनी विटा व दगडांचा मारा करून हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. अचानक हा सारा प्रकार घडला. विशेष म्हणजे पोलिसांचे एक पथकही त्यावेळी तिच्याबरोबर होते त्यांच्या समक्ष हा सारा प्रकार घडला आहे. तिच्याबरोबर असलेल्या तिच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जादा बंदोबस्त पाठवून स्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी सांगितले की पूनम यादव हिच्या कुटुंबियांशी शेजारच्या गावच्या प्रमुखांचा जमीनवरून वाद आहे त्यातून त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांना मोकळे सोडले जाणार नाही असे वरीष्ट पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पूनमने 69 किलो गटात शंभर किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)