पूनम ज्वेलर्सचे वटवृक्षात रुपांतर

  • मुहूर्तावर सुवर्ण खरेदीसाठी गर्दी : चोख दागिन्यांसह विविध योजना

जुन्नर – येथे 1982मध्ये सुरु झालेल्या 240 चौरस फुटांच्या एका छोट्याशा दुकानाचे आज “पूनम ज्वेलर्स’ नावाच्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. जुन्नर तालुक्‍यातील सुवर्ण ग्राहकांचा विश्‍वास या पेढीने संपादन केला आहे. चोख दागिने, प्रामाणिकपणा आणि विनम्र सेवा या तीन तत्त्वांच्या आधारेच आम्ही ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरल्याचे या पेढीचे मालक मधुकर पांडुरंग काजळे यांनी सांगितले.
जुन्नर शहरात या पेढीची विविध दालने असून नारायणगाव येथील ग्राहकांच्या मागणीनुसार तेथे शाखा सुरू करण्यात आल्याचे काजळे यांनी सांगितले. साधारण कुटुंबांमध्ये जन्म झाल्यानंतर दागिने दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केलेल्या काजळे यांची विविध सामाजिक कामे करताना अनेक संघटनांशी घट्टपणे नाळ जोडली गेली. व्यवसायिक प्रगतीचा आलेख उंचावत असतानाच काजळे यांची जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविणारे “मप्पा’ या नावाने ओळख निर्माण झाली. जुन्नर शहरात नगरसेवक म्हणून सातत्याने दहा वर्षे काम करताना नागरिकांच्या अनेक समस्या सोडविल्या. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनतेच्या पाठींब्यावर अपक्ष म्हणून निकराची लढत दिली. अवघ्या काही मतांच्या फरकामुळे यशाने हुलकावणी दिली असली तरी जनतेच्या मनात मप्पांनी विशिष्ट स्थान निर्माण केल्याचे स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष गोविंदराव हिंगे यांनी सांगितले.
पूनम ज्वेलर्सच्या यशस्वी वाटचालीत पत्नी सुजाता, मुलगा शुभम, मुलगी ऍड. प्रेरणा व इंजि. पूनम यांचा मोलाचा वाटा आहे. आत्मविशास, जिद्द आणि सचोटीचे दुसरे रूप म्हणजे “मप्पा’ असे सुवर्ण योजनांच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित ग्राहकांनी सांगितले. ग्राहकाचे समाधान हे एकच ध्येय असून समाजातील गरजूंना मदत करण्यात व त्यांच्या समस्या सोडविण्यात एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे काजळे यांनी याप्रसंगी सांगितले.

जुन्नर तालुक्‍यात यंदा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून पीडित गावांना आवश्‍यक मदत करणार आहे.
– मधुकर काजळे, मालक, पूनम ज्वेलर्स


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)