पूजा भट बनवणार महेश भटवर सिनेमा 

पूजा भट गेल्या काही वर्षांपासून लाईम लाईटपासून दूर आहे. पण आता तिला पुन्हा सक्रिय व्हायचे आहे. पप्पा महेश भट यांच्यावर एक डॉक्‍युमेंटरी बनवण्याची तिची ईच्छा आहे. महेश भट हे बॉलिवूडसाठी मोठे दाता आहेत. ते सिनेसृष्टीला सतत काही तरी देतच राहिले आहेत. वडिलांचे आणि आपले खूपच चांगले कनेक्‍शन राहिले आहे. ते एखाद्या समुद्रासारखे आहेत. सगळ्या गोष्टी आपल्या पोटामध्ये सामावून घेतात. त्यांच्यासाठी कोणतेही काम लहान किंवा मोठे नाही. कोणत्याही विश्‍वात त्यांना घेऊन गेले, तरी ते मनापासून त्यात समरस होतात. असेही तिने सांगितले.

डॉक्‍युमेंटरी बनवण्यामागील हेतू महेश भट यांचे उदात्तीकरण करण्याचा आपला हेतू मुळीच नाही. तर या डॉक्‍युमेंटरीच्या निमित्ताने पप्पांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. ते माझे पिता आहेत, दोस्त आहेत की शिक्षक आहेत, हे उलगडण्यासाठीच ही डॉक्‍युमेंटरी आपण करणार असल्याचे तिने सांगितले. महेश भट यांनी 1974 मध्ये दिग्दर्शनाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांच्या कारकिर्दीत सारांश, आशिकी, दिल है के मानता नही, अर्थ, सरआणि सडक सारख्या हिट सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)