पूजा डाडवालच्या उपचारासाठी सलमानची मदत

सलमान खानबरोबर “विरगती’ मध्ये काम केलेली हिरोईन पूजा डाडवाल सध्या शिवडीच्या रुग्णालयामध्ये उपचार घेते आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे पूजा डाडवालच्या उपचारामध्ये आर्थिक मदत करण्याचा निर्णय आता सलमान खानने घेतला आहे. पूजा लवकरच ठिक होईल, असा विश्‍वासही सलमानने एका इंटरव्ह्यूदरम्यान व्यक्‍त केला.

पूजाला जास्तीत जास्त मदत करण्याचा आपला प्रयत्न असेल. हेलन आंटी सध्या पूजा डाडवालच्या देखभालीकडे लक्ष देत आहेत. पूजा डाडवालची आर्थिक स्थिती इतकी खराब असेल असे आपल्याला कधीच वाटले नव्हते, असे सलमान म्हणाला. भोजपूरी अभिनेता रवि किशननी मध्यंतरी पूजाच्या मदतीमध्ये पुढाकार घेतला होता.

हैदराबादेत प्रमोशनदरम्यान रवि किशनने आपल्या सहकलाकाराच्या हाती काही रोख रक्कम आणि फळे पूजासाठी पाठवली होती. रवि किशनने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये पूजा हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये असल्याचे दिसत आहे. पूजाने उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यावर हा सगळा मामला उघड झाला होता. पूजा डाडवाल सध्या टिबी आणि फुफुसांच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारपणामुळे पूजाच्या पती आणि अन्य कुटुंबियांनी तिची साथ सोडली आहे. “विरगती’, “हिंदुस्थान’ आणि “सौगंध’ आदी सिनेमांमध्ये तिने काम केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)