पुुरूषोत्तम जाधव यांना डॉक्टरेट प्रदान

गोवा ः पुरुषोत्तम जाधव यांनी डॉक्टरेट प्रदान करताना डॉ. प्रियरंजन त्रिवेदी. शेजारी उपस्थित मान्यवर.

सातारा ः कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्यावतीने जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरूषोत्तम जाधव यांना डॉक्‍टरेट पदवी बहाल करण्यात आली. पुरूषोत्तम जाधव यांनी जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक,राजकीय, कृषी, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समाजप्रबोधन आदी क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल ही पदवी प्रदान केली आहे. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. आफताब अन्वर शेख व कॉन्सुलेट जनरल डॉ.एच.ई. हेक्‍टर कुविया जॉकोब, इंदिरा गांधी टेक्‍नॉलॉजी व मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ.प्रियरंजन त्रिवेदी यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
गोवा येथील हॉटेल ताजमध्ये कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात याचे वितरण झाले. यावेळी श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड इकॉनिमिक्‍सचे डॉ. मनोज कामत, दि एस. एस. ए. गर्व्हमेंट कॉलेज ऑफ आर्टस्‌ ऍण्ड कॉमर्सचे डॉ. फिलीप मॅलो, डॉ. रॉडनी डिसीलव्हा यांची प्रमुख उपस्थिती होती.
एका मंदिराच्या जिर्णोध्दारापासून पुरूषोत्तम जाधव यांच्या सामाजिक कार्यास प्रारंभ झाला.2007-08 साली खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथे पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याबरोबरच शेतकरी, खेळाडूांबरोबरच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासही प्राधान्य दिले जाते. पुरूषोत्तम जाधव हे पोलीस दलात कार्यरत होते. लाचलुचपत प्रतिबंधक या विभागामध्ये भ्रष्टाचारी अधिकार्यांना स्वतः फिर्यादी बनून लाच घेताना पकडून अनेक कारवाई केल्या. प्रामाणिकपणे सचोटीने 20 वर्षे सेवा करून पोलीस दलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. पुरूषोत्तम जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांची कन्या पूजा हिच्या विवाहप्रसंगी खर्चात बचत करून स्वच्छता तिचा अधिकारया उपक्रमासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. या उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये बांधली जातात. त्यासाठी पुरूषोत्तम जाधव यांनी रोटरी कल्ब ऑफ पुणे रॉयल ट्रस्ट या संस्थेला हा धनादेश प्रदान केला. उन, वारा, पावसाची पर्वा न करता माऊलींच्या वारीमध्ये सहभागी होणार्या वारकर्यांसाठी पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने मोफत वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिका सेवा प्रत्येकवर्षी देण्यात येते. पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले आहेत.पुरूषोत्तम जाधव यांच्यावर या सन्मानासाठी मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)