पुस्तक लिहिण्यासाठी कॅन्सरच्या यातना आठवाव्या लागल्या- मनिषा

मनिषा कोईरालाने कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करण्याच्या आपल्या अनुभवावर आधारीत “हील्ड’ हे पुस्तक लिहीले आहे. तिच्या या पुस्तकाचे प्रकाशन नुकतचे झाले. त्यानिमित्ताने तिने या पुस्तकामागील आपल्या भावना व्यक्‍त केल्या. पुस्तकाच्या संदर्भाने तिला कॅन्सरच्या यातना पुन्हा आठवाव्या लागल्या. त्या यातनांची आठवणीदेखील कॅन्सर इतक्‍याच त्रासदायक होत्या, असे आता तिला वाटते.

2012 मध्ये मनिषाला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले होते. वर्षभर विदेशात उपचार घेतल्यानंतर 2013 पासून ती कॅन्सरमुक्‍त जीवन जगते आहे. मात्र कॅन्सरच्या उपचारादरम्यान आलेले अनुभव, मनात उठलेले विचार आणि त्यासगळ्यातून बाहेर पडल्यावर आपल्या आयुष्यात आलेल्या परिवर्तनाची अनुभूती यासगळ्याची सविस्तर मांडणी मनिषाने “हील्ड- कॅन्सर गेव्ह मी अ न्यू लाईफ’ पुस्तकात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुस्तकाच्या निमित्ताने कॅन्सरच्या वेदना आठवताना अनेकवेळा तिला त्या वेदनांची आठवणही नको वाटायची. पुन्हा ती आठवणदेखील नको, म्हणून कित्येकदा तिने पुस्तक लिहिण्याचा बेतच रद्द करून टाकला होता. आपण हे पुस्तक पूर्ण लिहूच शकणार नाही, असेही तिला वाटायचे. मात्र हा चुकीचा विचार आहे. असा विचार आपण करता कामा नये असे तिच्या मनात यायचे आणि ती पुन्हा नव्या जोमाने पुस्तक लेखनाच्या कामाला सुरुवात करायची.

कॅन्सरवरच्या उपचारांच्या काळात तिला बॉलिवूडमधील अनेकांकडून पाठिंबा आणि सद्‌भावना मिळाल्या होत्या. त्यामध्ये रेखा, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, भाग्यश्री, महेश भट्ट, इम्तियाझ अली आणि दिया मिर्झा सारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. कॅन्सर झालेल्या रुग्णांना प्रेरणा मिळावी, जगण्याची नवीन उमेद मिळावी यासाठी आपली कहाणी लोकांसमोर यायला पाहिजे असे वाटल्याने मनिषाने हे पुस्तक लिहीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)