पुस्तकांमुळे माणसाची जडणघडण होते – कुलकर्णी

पुणे – आपल्याला पुस्तकेच घडवतात. चांगली पुस्तके वाचल्याने व्यक्तीमध्ये प्रगती होऊन पर्यायाने देश पुढे जाण्यास मदत होते. पुस्तके ही सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असुन त्यातुन माणसाची जडणघडण होते, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

प्रसिध्द सतारवादक उस्ताद उस्मान खॉ यांच्या शिष्या जया जोग यांनी लिहीलेल्या शून्य उत्तराची बेरीज या लघुकादंबरीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी राघवेंद्र जोशी, माजी पोलिस महानिरीक्षक अजित पारसनीस , जया जोग आदी उपस्थित होते.

-Ads-

कुलकर्णी म्हणाल्या, एखादे चरीत्र लिहीणे वेगळे यामध्ये व्यक्ती आपल्या समोर असते परंतु कल्पनेतुन एखादी भूमीका साकार करण्याचे काम सृजनशील लेखकच करु शकतात. जोशी म्हणाले, सुंदर साहित्य कृतीची रसिकांना चांगली जाण असते. पुस्तके अनंत तपस्येने मिळविलेले ज्ञान आपल्यासमोर ठेवतात या कादंबरीत एका समृध्द घरात जन्मलेल्या मुलीची नकळत झालेली वाताहात दाखवलेली आहे. उन्मेष प्रकाशनच्या मेघा राजहंस यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)