पुस्तकांमुळे माणसांचे जीवन समृद्ध – प्रा. पाटील

करंजे- पुस्तकाचे वाचन माणसांचे जीवन समृद्ध करतात म्हणून प्रत्येकाची घरी पुस्तके असणे महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचून जीवनमानाची उंची ठरवता येते. आत्मविश्‍वास असलेला शिक्षक विद्यार्थी घडवू शकतो यासाठी त्यांना बळ देण्याचे काम समाजाने केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी केले. वाणेवाडी (ता. बारामती) येथे साहित्यप्रेमी मंडळ यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळा रविवारी (दि. 5) करण्यात आला होता, त्यावेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन, सोमेश्‍वर कारखान्याचे संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, शैलेश रासकर, सुनिल भोसले, सरपंच स्मिता काकडे, विक्रम भोसले, बाळासाहेब जगताप, प्रा. प्रकाश गायकवाड, प्राचार्य धनंजय बनसोडे, संभाजी काकडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, अंगणवाडी सेविका रेश्‍मा शेंडकर, सोमेश हेगडे आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील विविध विद्यालयात आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा शिक्षकांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा.हनुमंत माने, सूत्रसंचालन राजेंद्र झुंरुंगे तर प्रा. संभाजी गायकवाड यांनी आभार मानले.
वाणेवाडी (ता. बारामती) : साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने रेश्‍मा शेंडकर यांना सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)