पुस्तकांच्या गावात ‘गुण गाईन आवडी!’

पाचगणी – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके या तीनही प्रतिभावंतांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांचे सार्थ स्मरण करण्यासाठी शनिवार, 8 रोजी पुस्तकांच्या गावात, खुल्या प्रेक्षागृहात, सायंकाळी 3:30 वाजता गुण गाईन आवडी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

भिलारमध्ये 8 व 9 डिसेंबर राज्य मराठी विकास संस्थेच्या सहाकार्यातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या माध्यमातून लेखक-प्रकाशक संमेलन होत आहे. या संमेलनासाठी नामवंत साहित्यिक, विचारवंत, प्रकाशक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने, मोठ्या संख्येने साहित्यिक आणि प्रकाशक भिलारला भेट देत आहेत, याबद्दल राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आनंद व्यक्त केला केल्याची माहिती डॉ. काटीकर यांनी दिली.

-Ads-

हा कार्यक्रम विनाशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे. लेखक-प्रकाशक संमेलनातील सहभागी प्रतिनिधी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेणार आहेतच. त्याचबरोबर गुण गाईन आवडी या कार्यक्रमासाठी वाचक, पर्यटकांसह रसिकांनी, वाचकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. आनंद काटीकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)