पुसेसावळीच्या श्रीतुळजाभवानीचा मंगळवारी रथोत्सव

विविध धार्मिक कार्यक्रमासह भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन

पुसेसावळी (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यातील पुसेसावळी गावचे आराध्यदैवत श्री तुळजाभवानी देवीचा रथोत्सव दि. 8 ते 14 पर्यंत होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन श्री तुळजाभवानी मंदीर ट्रस्ट व ग्रामस्थ पुसेसावळी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

माजी सभापती चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून दि. 8 रोजी पहाटे काकडा आरतीने यात्रेस सुरवात होणार आहे. रात्री 9 वा. दत्ता महाराज फरांदे यांचे किर्तन होणार आहे. रविवार, दि. 9 रोजी निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांचे किर्तन होणार आहे. सोमवार, दि. 10 रोजी सकाळी नवचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन व सायंकाळी महाआरती होणार आहे. रात्री 9 वा. प्रदीप महाराज जळगाव यांचे किर्तन होणार आहे. दि. 11 रोजी सकाळी 10 वा. ह.भ.प महेश महाराज कारंडे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर तुळजाभवानी देवीची रथातून भव्य मिरवणूक निघणार आहे.

बुधवार, दि. 12 रोजी दुपारी 3 वा. कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान भरवले जाणार आहे. रात्री 9 वाजता कमल वनिताराणी कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. गुरुवार दि. 13 रोजी रात्री 9 वा. झंकार ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, दि. 14 रोजी देवीचा भंडारा असून सायंकाळी 7 वा. जि.प.कन्या शाळा पुसेसावळी यांचा विविध गुणदर्शन सोहळा व जागर गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. 18 रोजी जि. प. शाळा मुले यांचा विविध गुणदर्शन सोहळा कार्यक्रम होणार आहे. तसेच यात्रेनिमित्त भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. पुसेसावळी व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीतुळजाभवानी मंदीर ट्रस्ट व ग्रामस्थ पुसेसावळी यांच्यावतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)