पुसेगाव येथे शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धांना प्रारंभ

पुसेगाव – पुसेगाव, ता. खटाव येथील सदगुरु श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ भरणाऱ्या वार्षिक यात्रेनिमित्त दिवसरात्र अखिल भारतीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या. येथील हनुमानगिरी हायस्कुलच्या पटांगणावर दि. 1 व 2 रोजी दिवसरात्र होणाऱ्या स्पर्धेसाठी अरूणकुमार उत्तरप्रदेश, लकी- खली पंजाब, सुरेश हरीयाणा, ज्यु. बिटू दिल्ली, भोपाळ पवनदीप, जामनेर युनुस शेख, राजस्थान, कर्नाटक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली, मुंबई शहर, मुंबई महानगरपालिका, कवठेमंहाकाळ, उंब्रज, माळशिरस, टेंभूर्णी, मणेराजूरी, भारती विद्यापीठ पुणे, हिंगणगाव,मोहोळ, कराड, नांद्रे येथील नामांकीत 36 संघांचा समावेश आहे. दोन स्वतंत्र मैदाने तयार करण्यात आली आहेत.

पंच म्हणून नंकुमार भोइटे, रमेश पवार, आबा गायकवाड, जावेद मनोरे,आब्बास ऐतवडे काम पाहत आहेत. विजेत्या संघांना अनुक्रमे 25000, 15000,10000,5000 तर पाचव्या ते आठव्या क्रमांकांना 2000 रूपये रोख बक्षिस देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या संघास सेवागिरी चषक देण्यात येणार आहे. दि.1रोजी सांयकाळी 5 वाजता या स्पर्धेला सुरूवात झाली .प्रारंभी मठाधिपती सुंदरगिरी महाराज टस्ट चेअरमन डॉ सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख,प्रताप जाधव, सुरेश जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामन्यांचे उदघाटन झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी विश्‍वनाथ जाधव, भरत जाधव, विजय जाधव जे. टी. जाधव, अशोक जाधव, प्रा. डी. पी. शिंदे. श्रीधर जाधव, जावेद मनोरे, सचिन जाधव, मंगेश जाधव, मयूर विधाते, आकाश पाटोळे, गौरव शेडगे, प्रतिक जाधव, निखील जाधव, अभिषेक पाटोळे, करण आवळे, दिपक जाधव, राजेंद्र तारळकर, रविंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)