पुसेगाव यात्रेत पहिल्यांदाच अत्याधुनिक सीसीटीव्ही

पोलिसांनी राबविली प्रभावी यंत्रणा : सुयोग्य नियोजनामुळे सेवागिरी रथोत्सव सुखकर

प्रकाश राजेघाटगे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुसेगाव – मोठ-मोठ्या यात्रा-रथात्सवांमध्ये लाखो भाविक येत असल्याने प्रशासनावर मोठा ताण असतो. तथापि, पुसेगाव येथील पोलिस प्रशासनाने अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, सुयोग्य पार्किंग याबराबरच चोख बंदोबस्त केल्याने सेवागिरी रथोत्सव भाविक आणि स्थानिकांसाठी सुखकर ठरला. रथोत्सव काळात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करावी, याचा मापदंड पुसेगाव येथील यात्रेतदिसून आल्याने एकूणच सर्व शासकीय विभागात पोलिस विभागाचे काम उजवे ठरले आहे.

श्री. सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवासाठी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. त्यामुळे नियोजनासाठी शासकीय पातळीवर महिनाभर अगोदरच तयारी केली जाते. यंदाही तशी तयारी झाली होती. श्रीसेवागिरी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या मदतीने भाविक व यात्रेकरूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात आल्या. काही विभागाच्या उपाययोजना कागदावरच राहिल्या तर काही विभागानी चांगल्या पद्धतीने काम केल्याचे दिसले. त्यातही पोलीस विभागाने काम सर्वाधिक उठून दिसले.

सपोनि विश्‍वजीत घोडके यांनी सहा महिन्यांपूर्वीच पदभार स्विकारला आहे. त्यांच्यादृष्टीने यात्रेचे नियोजन हे नवीन होते. तरीही ते त्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरले. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धिरज पाटील, कोरेगाव विभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, वडूज विभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली 22 पोलीस अधिकारी, 315 पोलीस कर्मचारी, 250 होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाची 1 प्लाटून, दंगा काबू पथक, वाहतूक शाखेचे कर्मचारी असा फौजफाटा नेमण्यात आला. बॉम्बशोध व नाश पथक, घातपात विरोधी तपासणी पथक नेमण्यात आले होते.

पुसेगावची यात्राही प्रामुख्याने पुसेगाव-निढळ रस्त्याच्या बाजूने भरते. त्यामुळे यात्रा कालावधीत वाहतूक कोंडी ही नित्यांचीच असते. नेहमीची ही अडचण दूर करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. यावर्षी रस्त्यावर कोणतीही वाहतूक कोंडी झाली नसल्याने प्रकर्षाने जाणवले. पुसेगावच्या चारही बाजूंना वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती.
यावर्षी सेवागिरी मंदिरापासून 200 मीटर अंतरावर पार्किगची सोय केल्यामुळे भाविकांची उत्कृष्ट सोय झाली होती. सेवागिरी मंदिर व छत्रपती शिवाजी चौकात चारही बाजुंना 200 मीटर परिसरात नो-पार्किग करण्यात आले. त्याशिवाय 150 ठिकाणी यात्रेकरूंसाठी सुचना फलक लावण्यात आले.

यात्रा भरताच जीपवर ध्वनिपेक्षाकावरून सुचना करण्यात आल्या. व्यावसायिकांनी रस्त्यावरून ठराविक अंतरावर मागे बसवण्यात आले. फेरीवाले, हातगाडे, विक्रेत्यांना सतत चालते ठेवण्यात आले.सेवागिरी मंदिर ते शासकीय विदयानिकेतन या दरम्यान ठराविक अंतरावर पोलीस तैनात करण्यात आले. यासर्व प्रयत्नांमुळे यात्रेच्या गर्दीतही वाहतूक सुरळीत सुरू राहिली. 30 डिसेंबरपासुनच गावात जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. दि.3 ते 6 या कालावधीत गावातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या सर्व उपाययोजनांच्या परिणाम प्रत्यक्षात दिसून आला. यात्रेच्या गर्दीत कोठेही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)