पुसेगाव यात्रेत दीडशे किलो प्लास्टिक जप्त

पुसेगाव, दि. 5 (वार्ताहर) – पुसेगाव येथे यात्रा कालावधीत प्लास्टिक बाळगणाऱ्या 21 व्यापाऱ्यांवर जिल्हा परिषद व खटाव पंचायत समितीने धडक कारवाई करत दीडशे किलो प्लास्टिक जप्त केले.

पुसेगाव येथे सालाबादप्रमाणे श्रीसेवागिरी रथोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावर्षी यात्राकाळात प्लास्टिक बंदी काटेकोरपणे पाळली जाणार असून व्यापाऱ्यांनी सूचनांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, यात्रा कालावधीत जिल्हा परिषद व खटाव पंचायत समितीने धडक कारवाई करत प्लास्टिक बाळगणाऱ्या 21 व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सुमारे दीडशे प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपमुख्य कार्यकारीअधिकारी किरण सायमोते, गटविकास अधिकारी रमेश काळे, स्वच्छता तज्ज्ञ राजेश इंगळे, अमोल गोरे, रोहित जाधव, गटसमन्वयक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)