पुसेगावात सेवागिरी व्याख्यानमाला प्रारंभ

पुसेगाव – प्रशासनाने ठरवले तर अनेक चांगली विकास कामे होऊ शकतात. शासनाच्या योजना तत्परतेने व भ्रष्टाचार न करता झाले तरच ते समाजकार्य ठरते. प्रशासनाला कायद्याची अभेद्य चौकट मोडता येत नाही पण इच्छाशक्ती असेल तर चौकटीच्या आत कायद्याचा योग्य अर्थ लावून समाजोपयोगी कामे करता येतात, असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

पुसेगाव, ता. खटाव येथे सेवागिरी मंदिरात आयोजीत केलेल्या 18व्या सेवागिरी व्याख्यानमालेचे उद्‌घाटन देशमुख यांनी दिपप्रज्वलन करुन केले. याप्रसंगी ते बोलत होते. मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार, महाराष्ट्र बॅंकेचे शाखा व्यवस्थापक अरविंदकुमार सिंग, न्यू सातारा सहकारी पतसंस्थेचे शाखाप्रमुख रमेश पार्टे, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, माजी विश्वस्त बाळासाहेब जाधव उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, शासनाचे निर्णय व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची प्रशासनाची जबाबदारी असते. पण ते लोकांप्रती संवेदनशील नसेल तसेच प्रशासनातील लोकांचे मन व बुध्दी लोकांना बांधील नसेल तर लोकांना विकासाची फळे चाखता येत नाहीत. शासनाने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन त्यासाठी आर्थिक तरतुदही केली. पण प्रशासनाने समाजकार्याच्या भावनेने कार्य न केल्याने कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना वर्षभरात मिळू शकला नाही.

अमर्यादित अधिकार असणारे प्रशासन हत्तीसारखे प्रबळ असल्याने ते योग्यपणे कार्यरत रहावे यासाठी प्रसारमाध्यमांबरोबरच जनतेचा त्यार अंकुश असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सुनिताराजे पवार म्हणाल्या, सेवागिरी महाराजांनी भक्ती मार्गाबरोबरच विवेकवाद दिला. या व्याख्यानमालेमुळे विवेकवृध्दीस चालना मिळेल. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, समाजाची ज्ञानपातळी सतत उंचावण्यासाठी सातत्याने रंगत चाललेली ही व्याख्यानमाला यापुढेही सुरूच राहील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)