पुसेगावात सीसीटीव्ही कक्षाचे उद्‌घाटन

पुसेगाव – पुसेगाव येथील पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरा कक्षाचे उद्‌घाटन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, श्रीसेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्रीसुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव प्रेरणा कट्टे, परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, सपोनि विश्‍वजीत घोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुसेगाव शहर व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून योजनेस देवस्थान ट्रस्टने एक लाख व संपूर्ण बाजारपेठेतील व्यापारी यांनी एक लाख रुपये दिले आहेत. योजनेचे नियंत्रण कक्ष पुसेगाव पोलीस स्टेशन येथे बसवले आहे. संपूर्ण शहरात व बाजारपेठेत 12 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. ही योजना सपोनि विश्‍वजित घोडके यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्याने पूर्णत्वाला गेली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)