पुसेगावात मंगळवारी व्हॉलिबॉल स्पर्धा  

राष्ट्रीय खेळाडूंचा स्पर्धेसाठी सहभाग

पुसेगाव – परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरणाऱ्या यात्रेत मंगळवारी (दि. 1) व बुधवारी ( दि. 2) रोजी दिवसरात्र अखिल भारतीय व्हॉलिबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा व कर्नाटकसह महाराष्ट्रातील राष्ट्रीय खेळाडूंच्या संघानी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला असल्याने चुरशीच्या स्पर्धा पाहण्याची संधी व्हॉलिबॉल शौकिनांना मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धा व्हॉलिबॉल फेडरेशन व राज्य असोशिएशनच्या मान्यतेनुसार व नियमानुसार खेळवण्यात येणार आहेत.
येथील हनुमानगिरी हायस्कुलच्या प्रांगणात त्यासाठी दोन मैदाने तयार करण्यात येत आहेत. दिवसरात्र खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी स्वतंत्र व भरपूर प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून शौकिनांना स्पर्धेचा मनमुराद आनंद घेता
यावा, यासाठी मैदानाच्या चारही बाजूंना गॅलरीची सोय करण्यात येत आहे.

करसिंग व लकी (पंजाब), सुरेशकुमार (हरियाणा), अरुणकुमार शर्मा व निट्टू (उत्तर प्रदेश), ज्युनिअर बिटूटू व सुरेंद्रकुमार (राजस्थान) या राष्ट्रीय खेळाडूंच्या संघांबरोबरच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मालेगाव, नाशिक, सोलापूर, सांगली, मालेगाव, जामनेर, सिंधुदूर्ग, नगर, सातारा, जळगाव, जालना, कोल्हापूर, रायगड, विदर्भ व उस्मानाबाद येथील नामवंत राष्ट्रीय खेळाडूंचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्या संघांना अनुक्रमे 25 हजार रुपये, 15000रुपये, 10000 रुपये, 5000 रुपये व 2000 रुपयांची बक्षिसे व चषक देण्यात येणार असल्याचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)