पुसेगावमध्ये ब्रासबॅंड व बॅन्जो कलावंतांची बैठक उत्साहात

संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. अशोकराव जाधव, शकिलभाई झारी कार्याध्यक्ष

पुसेगाव – पुसेगाव, ता. खटाव येथे नुकतीच बॅंड व बॅंजोमालक, चालक व कलावंतांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत संघटेनच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. अशोकराव जाधव यांची तर प्रदेश कार्याध्यक्षपदी शकिलभाई झारी यांची निवड करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी शकिलभाई झारी होते तर जुन्या पिढीतील जेष्ठ कलाकार जयसिंगराव जाधव (पुसेगाव) व उत्तमराव जाधव(सातारा) यांची प्रमुख उपस्थिती होती. बॅंडवादन हा महाराष्ट्राच्या लोककलेचा भाग असल्याने शासन स्तरावरून मदत मिळाली पाहिजे, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या माध्यमातून कलाकारांना मोफत
उपचार सुविधा मिळणे, कलाकारांना दरमहा 5 हजार मानधन मिळावे, कलावंतांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करत असताना

पोलीस व आरटीओ प्रशासनाकडून होणार नाहक व जाणीवपूर्वक त्रास थांबावावा, तसेच बॅंड मालकाकडे असणारी जुनी वाहने आरटीओ कार्यालयकडून प्रमाणित करून मिळावीत, या व्यवसायात नवीन पिढीतील अधिकाधिक युवक आकर्षित व्हावेत, म्हणून बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

या बैठकीस रामभाऊ जाधव, दत्तात्रय जाधव, विठ्ठलराव माने, आण्णासाहेब भोंडवे, संतोष गोरे, शरद नामदास, अंकुश जवीर, शशिकांत जाधव, बाळासाहेब माने यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीस दिलीप माने, संदीप आवळे, शंकरराव जाधव, बाजीराव शेलार, दशरथ माने, प्रल्हाद माने, शामराव चव्हाण, अमोल भोंडवे, सुनील खिलारे, मोहन बुचाडे यांच्यासह सातारा, पुणे, बारामती, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यातील कलाकार व बॅंड मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)