पुसेगावच्या व्यापाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

व्यापाऱ्याने केली खंडणी मागितल्याची फिर्याद

सातारा, दि. 20 (प्रतिनिधी)- पुसेगाव, ता. खटाव येथील व्यापाऱ्याला मोबाईलवरून ओळख झालेल्या महिलेबरोबरचा संपर्क चांगलाच महागात पडला आहे. राजेश मोहनलाल शहा (वय 55) यांच्याविरुद्ध पुण्यातील महिलेने लैंगिक अत्याचाराची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे तर शहा यांनी कुमार पवार, बाळू व इतर तीन महिलांनी वाढे फाटा येथे जबरदस्तीने मोबाईल काढून घेत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद दिली आहे. परस्परविरोधी फिर्यादीमुळे तपासाचा गुंता वाढला आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी, पुण्यातील एका महिलेने तिच्या साथीदारांसह व्यापारी शहा यांना फोनवरून साताऱ्यात संपर्क केला. शहा यांच्या फिर्यादीप्रमाणे बाळू व कुमार या इसमांनी दि. 19 रोजी चार वाजता मानसी प्राईड लॉज परिसरातील पेट्रोल पंपाच्या परिसरात नेऊन मारहाण केली. पन्नास लाख रुपये दे अन्यथा बलात्काराची फिर्याद दाखल करतो अशी धमकी देत जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला. शहर पोलीस ठाण्यात तीन महिलांसह दोघांवर जबरी चोरी खंडणीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक डाळिंबकर अधिक तपास करत आहेत तर संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार व्यापारी राजेश शहा याने दि 20 रोजी पुणे -बेंगलोर महामार्गावर प्राईड हॉटेलच्या रुममध्ये तिला नेवून तिच्या इच्छेविरूद्ध शारीरिक अत्याचार केला. शहा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस उपनिरीक्षक मचले अधिक तपास करत आहेत .


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)