पुसेगावच्या कुस्ती मैदानात दहा लाख इनामाच्या कुस्त्या

80 फूट व्यासाच्या आखाड्यावर रंगणार नेत्रदीपक कुस्त्या

पुसेगाव, दि. 27 (प्रतिनिधी) श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ भरण्याऱ्या यात्रेनिमित्त यावेळी सत्पाल आखाडा दिल्ली, मोठा आखाडा लाडपूर (हरियाणा) तसेच राज्यातील प्रसिध्द तालिमीतील पैलवानाच्या लढती होणार आहेत. काटा कुस्त्यांसाठी प्रसिध्द असलेल्या या मैदानात यंदा विजेत्या पैलवानांना दहा लाखांपेक्षा अधिक इनामे देण्यात येणार आहेत. कोल्हापूरचा चपळ पैलवान विजय गुटाळ विरुद्ध हरियाणाचा उमेशकुमार तसेच महाराष्ट्राचा उगवता तारा सिकंदर शेख विरुध्द दिल्लीचा सनी जॉन, पुण्याचा कौतुक डाफळे विरुध्द झटपट कुस्ती करणारा कोल्हापूरचा भारत मदने आणि पुण्याचा अतुल पाटील विरुध्द कोल्हापूरचा संतोष दोरवड या रंगतदार लढती मैदानाचे आकर्षण ठरणार आहेत.
या चारही कुस्त्यातील विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्ण तसेच रौप्य पदक मिळवणाऱ्या नामांकित पैलवानांच्या 26 निकाली कुस्त्या पाहण्याची संधीही शौकिनांना मिळणार असल्याचे डॉ. सुरेश जाधव, कृष्णात जाधव व विजय जाधव यांनी सांगितले. कुस्तीशौकिनांसाठी यात्रास्थळावर सेवागिरी ट्रस्टने तयार केलेल्या ऐंशी फूट व्यासाच्या आखाड्या भोवती चारी बाजूस गॅलरी उभारण्यात येत आहेत. कुस्तीचे डाव-प्रतिडाव तसेच कुस्तीबद्दलचे जाणकार शंकर पुजारी कोथळीकर या स्पर्धेचे निवेदन करणार आहेत.
नामांकित मल्लांच्या होणाऱ्या लढती अशा : राजेंद्र सुळ सातारा वि. विजय धुमाळ कोल्हापूर, संदिप काळे पुणे विरुध्द विक्रम पारखे पुणे, उमेश शिरतोडे अकलूज विरुध्द राहूल सरक कोल्हापूर,हरियाणाचा परमिंदर विरुध्द अनिल धोत्रे बेनापूर, संतोष लवटे कोल्हापूर वि. उपमहाराष्ट्र केसरी रवि शेंडगे टेंभुर्णी, बाळू पुजारी इचलकरंजी वि. भरत लोकरे कोल्हापूर, अनिकेत खोपडे पुणे वि. गणेश कुमकुले कोल्हापूर, नवनाथ इंगळे कोल्हापूर वि. हणमंत पुरी पुणे, ऑल इंडिया चॅंपियन सोनबा गोंगाणे कोल्हापूर वि. नामदेव कोकाटे सराटी, संतोष पडळकर पुणे वि. प्रविण कुमार दिल्ली, प्रशांत शिंदे सांगली वि. महेश शिंदे खवसपूर, सोन्या सोनटक्के मुरगुड वि. विकास सुळ सातारा, अभिषेक तुर्कीवाडकर मुंबई वि. वैभव रासकर कडेगाव, विशाल राजगे पुणे वि. श्रीधर मुळीक पुणे, किरण बरकडे सोलापूर वि. दादा शेळके पुणे, विक्रम घोरपडे खवसपूर वि. विशाल कोकरे पुणे, महादेव माने सांगली वि. सुनिलकुमार हरियाणा, आशिष वावरे खुडूस वि. कुमार शेलार पुणे, ऑल इंडिया चॅंपियन सागर मारकड इंदापूर वि. सौरभ पाटील कोल्हापूर, विजय पाटील पुणे वि. बापू कोळेकर आटपाडी, महेश कुंभार पुणे वि. कन्हैया माने कुंडल, आकाश माने पुणे वि. बापू झरे जामखेड, बाबा आटकळे पंढरपूर वि. राजू हिप्परकर पुणे, सुमित गुजर पुणे वि. पंकज पवार लातूर, पृथ्वीराज पाटील मुरगुड वि. विनायक वाल्हेकर पुणे, पोपट घोडके वि. विलास डोईफोडे आणि जोतिबा अटकळे पंढरपूर विरुध्द निखील कदम पुणे या लढती लक्षवेधी होणार आहेत. मैदानात होणाऱ्या पाच हजार बक्षिसांपर्यंतच्या कुस्त्यांचे जोड गुरुवारी (ता. 3) स्पर्धेच्या दिवशी सकाळी नऊ ते बारा यावेळेत कुस्ती आखाड्यावर नोंदवण्यात येणार असून त्यासाठी स्पर्धकांनी वेळेवर हजर रहावे, असे आवाहन सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)