पुसेगावचे कृषी प्रदर्शन लय भारी..! 

शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
प्रदर्शनाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद

पुसेगाव – राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात जलसंधारण, पाणी फौंडेशन, पाणलोट, ठिंबक सिंचन, साखळी सिमेंट बंधारे, शेतीविषयक आधुनिक माहिती, नवनवीन तंत्रज्ञान, व्यापकता, उपयुक्तता, शेती मालावरील उद्योग प्रक्रिया, शेतीला पुरक असणारे व्यवसाय, लघुउद्योग, शेतीसंबंधी शासकीय अनुदान असणाऱ्या योजनांसह गृहीणींना उपयुक्त असणाऱ्या विविध गृहोपयोगी नामांकित कंपन्यांची माहिती देणाऱ्या स्टॉलजवळ शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सर्वच पातळ्यांवर हे प्रदर्शन लय भारी, असल्याची शेतकरी पोचपावती देत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री सेवागिरी महाराजांच्या 71 व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथील यात्रा स्थळावरील मैदानावर राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन श्रीसेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्‍सो ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. प्रदर्शनात जिल्हा परिषद कृषी विभागमार्फत जिल्ह्यातील विविध गावात केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा लेखाजोका मॉडेलच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून पाणलोटतील विकसित गावातील सिमेंट बंधारे, हरितगृह, शेततळी, पॅक हाऊस, शेडनेट हाऊस, शेततळी, डी सी. सी. टी, लुज बोल्डर तयार केले आहेत.
सेंद्रीय शेती विषयक माहिती ची पुस्तके, तसेच प्रगतशील शेतकऱ्यांच्या फळे-फुले भाजीपाला उत्पादनाचे नमुने ठेवण्यात आले आहेत. ट्रक्‍टर, सारा यंत्र, शेंगदाणा, ज्वारी, गहू, हरभरा, कडधान्य ऍटोमॅटीक पेरणी यंत्र, मका सोलणी यंत्र, बटाटा लागवड यंत्र, भांगलण यंत्र, पॉवर टेलर, कडबा कुट्टी, गवत कापनी यंत्र, स्प्रे पंप, रीपर, आले व बटाटा काढणी यंत्र, चेन ड्राईव्ह रोटावेटर व्हीजेटेबल अँड प्रुट मल्टीकटर यासह विविध नामांकित कंपन्यांची शेतीची आधुनिक कृषी अवजारे विक्रीसाठी आणली आहेत. या नवीन तंत्रज्ञानाची शेतकरी मनापासून पाहणी करुन खरेदी अथवा बुकींग करताना दिसत आहेत.

विविध कंपन्यांचे ट्रॅक्‍टर व अवजारे ठिंबक व तुषार सिंचनाचे संच आदी शेतीशी थेट निगडीत स्टॉल मार्फत आपआपल्या कंपनीचे संबंधित प्रतिनिधी शेतकऱ्यांना उत्पादनाची खासियत सांगताना मग्न दिसत आहेत. निर्भया पथकाचा स्टॉल याप्रदर्शनात महिला व युवतींसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

सामुहिक शेती, शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री योजना, पॅकिंग व्यवस्थापन, युवक व महिलांनी शेतीकडे लक्ष केंद्रित करावे, कोरडवाहू शेती, पॉलीहाऊस शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालनासह शेतीतील आधुनिक शेती विकासासह विविध कंपन्यांनी बनवलेली नाविन्यपूर्ण उत्पादने, यंत्रे, अवजारे, शेतीच्या बदलत्या आव्हानांनुसार विकसित झालेली कीटकनाशके, खते, बी-बियाणे, उद्योग प्रक्रिया, उपकरणे उत्पादन खर्च व नुकसान कमी करण्याबाबतचे नवे तंत्रज्ञान या प्रदर्शनात उपलब्ध झाले आहे.

महिला बचत गटांनी खाद्य पदार्थ, हस्तकला आणि सौदर्यप्रसाधने यांची स्टॉल लावली होती, हे स्टॉल पाहणे तसेच खरेदी करण्यासाठी महिला व यात्रेकरू मोठी गर्दी करत आहेत. राज्यातील शेतकरी व रोजगारच्या संधी शोधणारे युवक वर्ग प्रदर्शनात आवर्जुन हजेरी लावताना दिसत आहेत. या प्रदर्शनासाठी संचालक सोमनाथ शेटे यांनी स्टॉलची आकर्षक मांडणी केली आहे. सोमवारी प्रदर्शनाची सांगता असल्याची माहिती डॉ. सुरेश जाधव व सोमनाथ शेटे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)