पुष्पावती विद्यालयात पुस्तकांचे वाटप

ओतूर, दि. 19 (वार्ताहर) -ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालय डिंगोरे (ता. जुन्नर) येथे शासनाच्या सर्व शिक्षा अभियनांमार्फत देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आमले यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी दिली.

या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच संपत लोहोटे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय लोहोटे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, उपाध्यक्ष राजेंद्र डुंबरे, रोहिदास घुले, रघुनाथ तांबे, महेंद्र पानसरे, लक्ष्मण लोहोटे, पांडुभाऊ मंडलिक, अंकुश बनकर, सीमा सोनवणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक धोंडीभाऊ मोरे, उपमुख्याध्यापक पी. जे. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मनोहर लोहोटे, अंकुश थापेकर, शिवाजी शेरकर यांनी विद्यार्थ्यांना लाडू व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

अध्यक्षस्थानावरून जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आमले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून मोठे व्हावे. आपल्या आईवडीलांचे व गावाचे नाव मोठे करावे, आपली क्षमता सिद्ध करावी. तसेच दत्तात्रय लोहोटे, मनोहर लोहोटे, संपत लोहोटे, मनोहर लोहोटे यांनी संदेश देऊन स्वागत केले. या कार्यकमाचे प्रास्ताविक बबन डुंबरे यांनी केले. तर सूत्रसंचालन विठ्ठल शितोळे यांनी केले. आणि वनिता भोर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)