पुष्पावती विद्यालयात उभारणार शेड

ओतूर-डिंगोरे (ता. जुन्नर) येथील पुष्पावती विद्यालयात शेड उभारला जाणार असल्याने त्याच्या कामाचे भूमिपूजन हभप बाळकृष्ण महाराज कुलकर्णी आणि हभप ज्ञानेश्वर महाराज पटाडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 26) झाले. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या लता आमले यांच्या विशेष प्रयत्नाने व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य विश्वास आमले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शेडचे काम होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे होते. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच अस्मिता थापेकर, विष्णू शेरकर, प्रभाकर तांबे, पांडुरंग मंडलिक, वसंत लोहोटे, लक्ष्मण लोहोटे, संपत लोहोटे, बबन आमले, कृष्णाताई डुंबरे, पुरी, अंकुश बनकर, श्रीकृष्ण सोनवणे, प्रदिप गाढवे, प्रभाकर खरात,सबाजी लोहोटे, सिताराम पाडेकर, रविंद्र लोहोटे, प्रल्हाद पडवळ, सीमा सोनवणे, भारती आचार्य, राजू उकिर्डे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी केले. तर सूत्रसंचालन विठ्ठल शितोळे यांनी केले. नियोजन अनिल उकिर्डे यांनी केले. डी.डी. घोलप यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)