पुष्पवृष्टी करत “श्रीं’चा जन्मोत्सव साजरा

ओझर- भाद्रपद चतुर्थीला “श्रीं’च्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवारी (दि. 13) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी भाविकांनी फुलांची उधळण करत जन्मोत्सव उत्साहात साजरा केला. पहाटे 5 वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सुर्यकांत रवळे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वत पांडुरंग जगदाळे यांच्या हस्ते “श्री’स महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
द्वार यात्रेतील पहिल्या द्वारापासून चौथ्या द्वारयात्रेपर्यंत सनई चौघडा वादक दिनेश मावडीकर यांनी वादन केले. आजच्या चौथ्या द्वारासाठी ओझर येथील आंबेराई येथे जाण्यासाठी सकाळी 10 वाजता मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर नगरप्रदक्षिणा पूर्ण करून आंबेराई येथे पृथ्वी सूर्य पूजा करण्यात आली. द्वार यात्रेत वर्षा थोरात, अंकिता घेगडे, ऋतुजा घेगडे, दीपा वाळूंज व देवस्थान ट्रस्टच्या महिला कर्मचाऱ्यांनी जागोजागी रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले.
यावेळी ह. भ. प. विट्टलबाबा मांडे यांचे गणेशजन्माचे किर्तन झाले. महान साधू मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन ह. भ. प. भालचंद्र कवडे, भालचंद्र रवळे, किसन मांडे व अन्य ग्रामस्थांनी केले. तसेच दुपारी साढे बारा वाजता भाविकांनी पुष्पवृष्टी करून देवजन्म उत्सव साजरा केला. सकाळपासून दीड लाख भाविकांनी “श्री’चे दर्शन घेतले. विट्टल प्रासादिक भजन कवडे मंडळ, राम प्रासादिक भजन मांडे मंडळ, दत्त प्रासादिक भजन मंडळ, तसेच परिसरातील भजनी मंडळींची भजने झाली. या कार्यक्रमात विघ्नहराच्या मानलेल्या बहिणी जेथे द्वार यात्रा जाते ते शिरोली खुर्द, धनेगाव व उंब्रज ग्रामस्थांनी देवीचा आहेर म्हणून भरजरी वस्त्र भेट दिली. या आहेराची सवाद्य मिरवणूक काढून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे व माजी सरपंच जगन कवडे यांनी ग्रामस्थांचा सत्कार केला. जन्मोत्सवासाठी ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, के. एम. पाटोळे यांचा चोख बंदोबस्त होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)