पुष्पगुच्छांऐवजी दिली पुस्तके भेट

कराड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक देवून स्वागत करताना आ. शंभूराज देसाई. समवेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्यवर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. देसाईंकडून अनोखे स्वागत

काळगाव, दि. 25 (वार्ताहर) – मान्यवरांच्या भेटीकरीता जाताना त्यांना शाल, हार, पुष्पगुच्छ, श्रीफळ घेवून जाण्यांची रित सर्वत्र पाहायला मिळते. परंतु महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री हे पुष्पगुच्छ स्विकारत नाहीत ही गोष्ट हेरून पाटणचे शिवसेनेचे आ. शंभूराज देसाईंनी नवा पायंडा पाडला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कराड येथे आलेले राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ न देता कराड विमानतळ येथे त्यांचे स्वागत मानाची शाल व रॉन्डा बर्न यांनी लिहलेले ङ्गद सिकरेट नायक मराठी संस्करण व मितेश खत्री व इंदू खत्री यांनी लिहलेले आकर्षणाचा सिध्दांतफ अशी दोन प्रसिध्द पुस्तके देवून केले.
इतर मान्यवरांच्या हातात पुष्पगुच्छ आणि आमदार देसाईंच्या हातातील पुस्तकांचा स्विकार करताना हा उपक्रम अतिशय चांगला व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्याकरीता मुख्यमंत्री फडणवीस हे कराड येथे आले होते. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी अनेक आजी-माजी पदाधिकार्‍यांचा लवाजमा उपस्थित होता. यावेळी पाटणचे आ. शंभूराज देसाई यांनीही त्यांची भेट घेतली. त्यांचे स्वागत करताना इतरांप्रमाणे पुष्पगुच्छ न मानाची शाल व प्रसिध्द अशी दोन वाचनीय पुस्तके देवून केले.
आमदार देसाई हे सातत्याने विविध उपक्रम राबवित असल्याने त्यांच्या उपक्रमांचे कौतुक सातारा जिल्हयातील मान्यवर तसेच जनतेकडून नेहमीच केले जाते. आज रोजी त्यांनी मुख्यमंत्री यांचे केलेले अनोखे स्वागत याचीही चर्चा कराड विमानमळावर सर्व मान्यवरांमधून ऐकावयास मिळाली. आ. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांसोबत स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी भेट देवून अभिवादन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)