पुष्पक विमान : मनाला न भिडणारा प्रवास

‘पुष्पक विमान’ म्हटलं की आपल्याला संत तुकाराम महाराज आठवतात. आपल्याकडे आजही बहुतांश लोकांनी विमान प्रवास केलेला नाही आणि ग्रामीण भागातल्या अनेकांनी विमान फक्त आकाशात उडताना पाहिलेले आहे, त्यामुळे विमान प्रवासाचे आकर्षण अनेकांना आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘पुष्पक विमान’ चित्रपटात याच आकर्षणाचा प्रवास नात्यां भोवती गुंफण्यात आला आहे. मात्र हा प्रवास मनाला फार भिडत नाही.

‘पुष्पक विमान’ ही कथा आहे विष्णुदास उर्फ तात्या वाणी (मोहन जोशी) आणि मुंबईत स्थायिक झालेला त्यांचा नातू विलास (सुबोध भावे) यांची. तात्या आपल्या कीर्तनातून पुष्पक विमानाबद्दल निरुपण असतात,पुराणातल्या पुष्पक विमानाचं तात्यांना मोठ कौतुकआहे. तात्यांच्या मुलाचं आणि सुनेचं निधन झाल आहे.तात्यांचं विलासवर जीवापाड प्रेम आहे. पुढे विलास मुंबईला जातो त्याच लग्न कोकणातील स्मिता (गौरी किरण) सोबत झाले आहे. विलास – स्मिता आपल्या संसारात रमले आहेत तर तात्या गावाकडे एकटेच विलासाच्या आठवणीत, तो येण्याची वाट बघत बसले आहे, दरम्यान, तात्या आजारी असल्याचा निरोप विलासला मिळतो आणि तो धावत गावी परत येतो. तात्यांना एकटं जगताना पाहून मुंबईला चालण्याचा आग्रह तो करतो. नातवाच्या आग्रहाखातर ते मुंबईला येतात. गावच्या राहणीमानाची सवय असलेल्या तात्यांना मुंबईशी जुळवून घेणं शक्य होत नाही. एक दिवस तात्या परत गावी जायला निघतात. याचवेळी त्यांना मुंबईच्या विमानतळावरून उडणारं विमान दिसतं, पुढे काय होत हे जाणून घेण्यासाठी ‘पुष्पक विमान’ चित्रपटगृहात बघायला हवा.

-Ads-

वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘पुष्पक विमान’ची कथा अभिनेता सुबोध भावे याने लिहिली आहे. चित्रपटाची कथा ही चांगली असली तरी पटकथा काहीशी भरकटली आहे, या कथेत अनेक उपकथा उगाचच टाकल्यासारख्या वाटतात. मध्यांतरानंतर चित्रपटाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. पण मध्यांतरानंतर चित्रपटरेंगाळला आहे. मुंबईतील चाळीतील वातावरण,आजूबाजूचा परिसर दिग्दर्शकाने चांगल्या प्रकारे दाखवला आहे. संवादांची जळगावी शैली, सुपरकडक,गंदीपटाक, डंगऱ्या इत्यादी अहिराणी बोलीतले शब्द आल्याने सवांद गमतीशीर झाले आहेत. चित्रपट विनोदी ढंगातून भावनिकतेकडे प्रवास करतो. मात्र, पटकथाकमकुवत असल्याने अनेक प्रसंग फसले आहेत, परिणामी अध्यात्म, आजोबा – नातवाचे नाते, आजोबा आणि नातसून यांच्यातील नोकझोक या सर्व गोष्टीप्रेक्षकांच्या मनाला भिडल्या नाहीत.

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर या चित्रपटाची अभिनय हीच जमेची बाजू आहे. मोहन जोशी यांनी तात्या जिवंत केला आहे, मायाळू, तुसडे, इरसाल, सुनेला सासुचा इंगा दाखवणारे पण मनाने हळवे असलेले तात्या त्यांनी उत्तम साकारले आहेत. विलास साकारलेल्या सुबोध भावे यांच्याकडून अधिक अपेक्षा होत्या, अभिनेत्री गौरी किरणचा हा पहिलाच चित्रपट आहे, तिला अजून मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. राहुल देशपांडे यांचा संत तुकाराम ठीक आहे, सुयश झुंझुरकेचा फिरोज लक्षात राहतो, इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.

संगीतकार नरेंद्र भिडे यांची गाणी उत्तम झाली आहेत. कथा चांगली असली तरी पटकथा कमकुवत असल्याने आजोबा – नातवाची ही कथा वास्तव वाटत नाही, दिग्दर्शकाचा पहिला प्रयत्न चांगला असला तरी या ‘पुष्पक विमान’चा प्रवास प्रेक्षकांची अपेक्षापूर्ती करत नाही.

चित्रपट – पुष्पक विमान
निर्माते – मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल फडतरे आणि वर्षा पाटील
प्रस्तुतकर्ता – झी स्टुडीओज
दिग्दर्शक – वैभव चिंचाळकर
संगीत – नरेंद्र भिडे
कलाकार – मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी किरण, सुयश झुंझुरके

रेटिंग – 2.5

– भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)