पुलावर झोपलेल्या मजुरांना कारने चिरडले 

हरियानात पाच मजूर ठार 
हिसार – हरियानात िंजंदाल स्टील प्लान्ट जवळील एका पुलावर झोपलेल्या पाच मजुरांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. या घटनेच्या संबंधात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की कार भरधाव वेगाने जात असताना ती रोड डिव्हाईडरला धडकली. त्यानंतर ती फुटपाथवर चढल्याने तेथे झोपलेले मजूर त्या खाली चिरडले गेले.

हे मजुर याच पुलाच्या दुरूस्तीच्या कामी नेमण्यात आले होते व दिवसाचे काम संपल्यानंतर ते तेथेच झोपी गेले होते. ही कार मजुरांना चिरडून पुलाचा कठडा तोडून पन्नास फूट खोल कोसळली. त्यात कारच्या चालकालाही मोठा मार बसला आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे पण त्याची प्रकृती गंभीर असल्याचे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)