पुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू

सातारा- पुलवरून पडलेल्या एकाचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

उत्तम पांडूरंग मोरे (वय 45.रा.कारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दुर्योधन मोरे यांनी तक्रार दिली आहे.
उत्तम मोरे हे कारी गावानजीक असलेल्या एका पुलावर बसलेले होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. त्यातच ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)