वाठार येथील घटना : तेरा महिन्यांच्या मुलीसह चौघे जखमी

कराड, दि. 12 (प्रतिनिधी)- वाठार, ता. कराड येथे गुरुवारी दुपारी जयसिंगपूरकडे निघालेली कार चालकाचा ताबा सुटल्याने दक्षिण मांड नदीपात्रात कोसळून तेरा महिन्याच्या मुलीसह चौघेजण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत माहिती अशी, संगीता सुरेश नलवडे (वय 45), प्रियांका सनी नलवडे (वय 24 वर्षे), मिताली सनी नलवडे (वय 13 महिने, सर्व रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) सर्व रा. जयसिंगपूर हे कोल्हापूरकडे निघालेली कार (क्र. एम. एच. 09 डी. एक्‍स. 6660) गुरुवारी साडेबारा वाजता वाठारजवळ आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दक्षिण मांड पुलावरुन नदी पात्रात कोसळली. नदी कोरडी असल्याने मोठा अनर्थ टळला. कार नदी पात्रात कोसळल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. या अपघातातून 13 महिन्यांची मुलगी थोडक्‍यात बचावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)