पुलांवरील निर्माल्य कलश गायब

निर्माल्य टाकायचे कोठे? : नागरिकांचा सवाल

पुणे – “नदीत निर्माल्य टाकून प्रदूषण करण्याची आमची इच्छा नाही. मात्र, निर्माल्य टाकण्यासाठी महापालिकेकडून ठेवण्यात आलेले कलशच गायब असल्याने आम्हाला नाईलाजास्तव पुलावर निर्माल्य ठेवावे लागते,’ अशी खंत पुणेकर व्यक्त करत आहेत. हे निर्माल्य कलश गणेशोत्सवानंतर पुन्हा पुलावर ठेवलेच नसल्याने निर्माल्य नदीत टाकले जात आहे.

-Ads-

घरातील पूजेचे निर्माल्य थेट मुठा नदीत टाकले जाते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने सर्व नदीपुलांवर निर्माल्य कलश ठेवले होते. याशिवाय, “नदीत निर्माल्य टाकू नये,’ असे विनंतीफलकही लावले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांत आधी निर्माल्य कलश आणि आता हे विनंती फलकही गायब झाले आहेत. त्यामुळे काही नागरिक कलश असलेल्या जागेवर निर्माल्य ठेवतात. तर अनेकजण हे निर्माल्य नदीत टाकत आहेत. त्यामुळे एका बाजूला नदी पुनरुज्जीवनासाठी महापालिका हजार कोटींचा खर्च करत असतानाच दुसऱ्या बाजूला काही हजार रुपयांचे निर्माल्य कलश पुलांवर ठेवण्यास पालिकेस वेळ नसल्याने नदी प्रदूषण मात्र सुरूच आहे.

आम्ही यापूर्वी बालगंधर्व पुलावरील कलशामध्ये निर्माल्य टाकत होतो. मात्र, आता हा कलश गायब आहे. त्यामुळे आम्ही पदपथावरच निर्माल्य ठेवतो. अनेकदा कचरावेचक ते उचलून इतर कचऱ्यात टाकतात. ही बाब चुकीची आहे. आम्ही पुढाकार घेत असू तर महापालिकेनेही कलश उपलब्ध करावेत.
– एक ज्येष्ठ महिला, नारायण पेठ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)