पुलं हे मराठी चित्रपट क्षेत्रातील चॅप्लिन : शि. द. फडणीस

महापौर टिळक यांच्या हस्ते विशेष सन्मान

पुणे – पुलंचे व्यक्तिमत्व बहुरंगी आणि बहुढंगी होते. ते अनेक क्षेत्रात पारंगत होते. तसेच ते चित्रपट क्षेत्राकडे देखिल वळले मात्र चित्रपट क्षेत्रातील कटु अनुभवांमुळे त्यांनी या क्षेत्राकडे पाठ फिरवली. परंतु मराठी चित्रपटाने पुलंच्या रूपाने दाराशी आलेला चॅप्लिन गमावला, अशी खंत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली.

पुलोत्सवांतर्गत आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते विशेष सन्मान प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, मयुर वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

जे जे उत्तम आणि उदात्त होते त्यामागे पुलं कायम उभे राहिले. त्यांनी आपल्याला भरभरून दिले, त्याबद्दल आपण कायमच कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांनी समाजातील अनिष्ठ प्रथांवर टीका केली. एकेकाळी शब्दांना चित्रांची जोड कशाला, अशी विचारणा व्हायची. पुलंना चित्रांची अचूक जाण होती. पुलंना चित्र या माध्यमाविषयी खूप आस्था, प्रेम होते. फार कमी लोकांना या गोष्टीचे भान असते, पुलंना चित्रांचे उत्तम भान होते. स्केचबुक हे माझे जग आहे, तिथे मी ब्रह्म अनुभवतो. एकांतात मला अनेक आकृत्या दिसतात. पुलंचे अंतरंग आणि बाह्यरंग दोन्ही बहरूपी होते, त्यामुळे ते अनेक कलांकडे आकृष्ट झाले, असेही शि. द. फडणीस म्हणाले.

मी माझ्या मुलीला पहिल्यांदा पुलांची “बटाट्याची चाळ’ वाचायला दिले. हे साहित्य तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. पुलंची साहित्य परंपरा आणि विनोद निर्मितीचे सामर्थ्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी माझ्या भोवतालच्या तरूण पिढीला पुलंचे साहित्य वाचायला सांगते, कारण त्यातून व्यक्त होणारे जीवनविषयक तत्वज्ञान मला खूप महत्वाचे वाटते, असे महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)