पुर्ववैमनस्यातून कोयत्याने मारहाण

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी)
एक महिन्यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कोयता व लाथाबुक्कयांनी मारहाण केल्याप्रकरणी गोडोली येथील युवकासह अनोळखी तीन युवकांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अर्जुन विश्‍वनाथ शिंदे रा. भैरोबा मंदीर, गोडोली मुळ रा. वडी ता. खटाव याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजू मोरे रा. गोडोली याची व अर्जुन शिंदे यांची एक महिन्यापुर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती तेव्हापासून त्या दोघांच्यात वाद सुरू होते. त्याचाच राग मनात धरून राजू मोरे , रोहीत जाधव यांच्यासह अनोळखी दोघांनी दि. 29 रोजी अर्जुन राहत असलेल्या घरी जात त्याला व त्याच्या आईला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत दम दिला होता. दरम्यान राजू याने अर्जुनच्या डोक्‍यात कोयता मारल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.याप्रकरणाची अर्जुन शिंदे याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)