पुर्नवसन प्रकल्पाविरोधात दापोडीकर एकवटले

पिंपरी – दापोडी झोपडपट्टीतील घरांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याच्या विकास प्रकल्पाला जयभीमनगर, लिंबोरे वस्ती, सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात घेतलेल्या निषेध सभेत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुनर्वसन प्रकल्पातून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दापोडीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत आयोजित केलेल्या निषेध सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. नगरसेवक राजू बनसोडे, आशा शेडगे-धायगुडे, चंद्रकांता सोनकांबळे, संजय काटे, शेखर काटे, देविदास साठे, रवी कांबळे, सुनीता अडसूळ, सिकंदर सूर्यवंशी, देविदास साठे, चंद्रकांत गायकवाड, अकिल शेख आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्षानुवर्षे स्वतःच्या नावाने सातबारा व घरपट्टी भरत असलेल्या जयभीमनगर येथील नागरिकांच्या जागेवर झोपडपट्टीचे आरक्षण टाकून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून दिशाभूल व फसवणूक होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. या पुनर्वसन प्रकल्पास त्यांनी विरोध दर्शविला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला जात असल्याने नागरिकांचा कडाडून विरोध होत आहे. येथील नागरिक अनेक वर्षांपासून येथे स्थायिक असून, अनेक घरमालकांच्या एक ते चार गुंठ्यांपेक्षा जास्त जागांचा मालकी हक्क आहे. यावर अनेकांची दुमजली घरे उभारली आहेत. काहींची जास्त चटई क्षेत्र असलेली घरे असून, त्यांना सरकारकडून केवळ 269 चौरस फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे. या सभेचे आयोजन विनय शिंदे, रवी कांबळे, अजय पाटील आदींनी केले.

नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठीच सभेचे आयोजन करण्यात आले होते, खासगी जागा मालक व ज्यांचे सातबारा आहेत अशा रहिवाशांना शासकीय नियमाप्रमाणे परतावा देण्यात येईल. त्यासंदर्भातील तांत्रिक व किचकट मुद्दे व निर्णय आयुक्त व त्या खात्यातील अधिकारी व नागरिकांची बैठक घेऊन सोडवले जातील. कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येईल.
– सीमा चौगुले, सभापती, शहर सुधारणा समिती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)