पुरोगामी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनील पडवळ

सोरतापवाडी, दि. 7 (वार्ताहर)- हवेली तालुक्‍यातील नावाजलेली नायगाव सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक सुनील पडवळ यांची मुख्याध्यापकपदी सुनील पडवळ, पर्यवेक्षकपदी चव्हाण यांची नियुक्‍ती करण्यात आली. त्यावेळी त्यांचा सन्मान भाजपा सोशल मीडिया सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्‍य चौधरी, नर्सरी उद्योजक रमेश चौधरी, अजित कड, संतोष बाबर, जाधव, सुरेश कांचन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुख्याध्यापक पडवळ म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन एक चांगली पिढी घडविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यासाठी संस्थेतील पदाधिकारी व ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पडवळ यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक सुनील पडवळ यांची मुख्याध्यापकपदाची कारर्कीद यशस्वी होण्यासाठी शिवसेनेचे हवेली तालुका संघटक स्वप्नील कुंजीर, उद्योगपती रामदास कुंजीर, रामभाऊ वाईकर, शाखाप्रमुख भाऊसाहेब कुंजीर, युवासेना अध्यक्ष काळूराम कुंजीर, कल्पेश सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)