पुरोगामी जिल्ह्यात राजकीय, शैक्षणिक अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये भर

भगवंत मोरे : अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास यशाची खात्री

नगर – जिल्हा मित्र मंडळ यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच इन्स्टिटयूशन्स ऑफ इंजिनिअर्स सभागृहामध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलतांना भगवंत मोरे म्हणाले, जिल्हा हा पुरोगामी जिल्हा असून राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये भर टाकलेली आहे. विद्यार्थ्यांनीही जिद्द , चिकाटी आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते. यावेळी एमपीएससी, युपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या अशोक कानडे, राघवेंद्र घोरपडे, एमबीबीएस परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या डॉ. ऐश्‍वर्या भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी बाळासाहेब गायकर, पोलीस उपायुक्‍त सुनील बावडे, हनुमंत धुमाळ, अभियंता विजयकुमार ठुबे, पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अंजली गायकवाड, हिला झी युवा संगीत सम्राट पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, ऍड.बाळ बोठे, डॉ. संजय कळमकर, उत्तमराव करपे यांनी आपली मनोगते व्यक्‍त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी चौधरी यांनी व्यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)