पुरेशा झोपेचे चांगले फायदे

तुम्ही लहानाचे मोठे होत असताना अनेकवेळा ऐकलं असेल, की झोपं किती महत्त्वाची आहे वगैरे. तुम्ही मोठं झाल्यावर त्याचे खरे फायदे तुम्हालाही कळले असतील, परंतु जर कळले नसतील तर मात्र तुम्ही इतर गोष्टींच्या आनंदात गुंतून जाता आणि मग झोपेबाबत तडजोड करता. असे वारंवार केल्याने, तुम्हाला झोपेशी संबंधित मेटाफोरिकल पॅंडोरा बॉक्‍ससारखे प्रश्‍न जडू शकतात. हे त्रास सुरुवातील तितकेसे गंभीर वाटणार नाहीत कदाचित, परंतु तुम्ही जसजसे वयाने मोठे व्हाल तसतसे त्याचे त्रास वाढू लागतील.
चांगल्या झोपेचे पाच फायदे
वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
चांगल्या झोपेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि दिसणारा फायदा म्हणजे तुमचे वजन एकदम आटोक्‍यात राहाते. होय! तुमच्या झोपेच्या पद्धतीत काही बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम वजन वाढण्यात होतो. कारण? उत्तम झोप तुमच्या शरीराला आराम देते, तसेच लॅप्टिन संप्रेरकाची पातळीही योग्य प्रमाणात राखते. हे योग्य पातळीतील संप्रेरक अनावश्‍यक भूकेला आळा घालते आणि तुमच्या शरीरातील ऊर्जेचे प्रमाण राखते. संप्रेरकाची पातळी घसरल्याने तुमच्या शरीराला अधिक ऊर्जेची गरज भासते, यामुळेच तुमचे अन्नसेवनाचे प्रमाणही वाढते.
दुखणे निभावणे सोपे जाते
तुम्हाला अलिकडे कुठली जखम झाली असेल किंवा तीव्र वेदना झाली असेल, तर योग्य झोप मिळणे अत्यावश्‍यक आहे. खरं तर, तुमच्या त्रासासाठी झोप हाच उत्तम उपाय असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. पण यामागचे कारण काय आहे?आपल्या शरीराला जखम झाल्यावर किंवा सांधेदुखीसारखे गंभीर आजार झाल्यास दाहक प्रथिने सोडतात, ही शरीराची नैसर्गिक उर्मी आहे. झोपेचा अभाव असेल, तर शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अधिकाधिक दाहक प्रथिने सोडली जातात. यामुळेच स्वस्थ झोपा आणि तुमच्या लक्षात येईल, की तुमचं दुखणं कसं पळून जातं.
नैसर्गिक उर्मी चांगल्या राहतात
अभ्यासात असे सूचित करण्यात आले आहे, झोपेच्या अभावामुळे पुरुषांमधील टेस्टोटेरॉन स्तराचे प्रमाण कमी होते. यामुळे उत्तेजनेसंबंधी अडचणी निर्माण होतात. महिलांमध्येही लैंगिक गरजांमध्ये घट होत असते. एकूणात योग्य झोप मिळणे, हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कारणासाठी तरी गरजेचे आहे.
तुमचा मूड छान राहतो
यामुळे मेंदू नसल्यासारखी अवस्था होते, परंतु तुमची झोप चांगली झाली असेल तर तुमचा मूड मात्र चांगला राहतो. अगदी परिपूर्ण आनंद नाही कदाचित मिळणार, परंतु योग्य झोपेमुळे तुम्ही आनंदी मात्र नक्कीच राहू शकतात. यामुळे तुमच्या शरीर दमलं तरीही योग्य वेळेत ते पुन्हा तयार होऊ शकतं आणि आपले स्रोत पुन्हा उभारू शकतं. खरं तर, अभ्यासाअंती झोपेच्या अभावामुळे असंतुलित भावनिक गुंतागुंत होते, हे सिद्ध करण्यात आले आहे. अखेरीस म्हणजे चांगली झोप तुमच्या शरीराला वेळोवेळी पुन्हा ताजेतवाने करते, सुधारते आणि पुन्हा उभारायला मदत करते. तसेच आपल्याला शारिरीक दृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या संतुलित राहायला मदत करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)