पुरूषाचा मृतदेह भांडगावात आढळला

यवत – भांडगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत भांडगाव-खोर फाट्यालगत टपरीजवळ पुरुषाचा मृतदेह (दि.19) आढळून आला आहे. या पुरुषाचे निधन हृदयविकाराच्या झटक्‍याने झाल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अकस्मात मृत्यु, अशी नोंद पोलिसांनी केली आहे.

या पुरुषाचे वय अंदाजे 51 ते 53 वर्ष वयाचे आहे. डोक्‍यास काळे -पांढरे लांब केस असून दंडावर, छातीवर आणि कंबरेस व पायाच्या दोन्ही मांडीस गोंधलेले आहे. रंग काळा-सावळा, अंगाने मजबूत आहे. अंगात निळसर फुल बाह्याचा शर्ट व जर्किंग, नेसलीस राखाडी रंगाची फुल पॅंट घातलेली आहे. तो सायकलवर फिरत असताना आपले टोपण नाव राजेश खन्ना अडसूळ असल्याचे नागरिकांना सांगत असे, या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास 02119 – 274233 किंवा 7350181317 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)