पुरुष व महिला हॉकी संघ रिकाम्या हाताने परतणार

गोल्ड कोस्ट – भारताचे पुरुष व महिला हॉकी संघांना 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून रिकाम्या हातानेच परतावे लागणार आहे. भारताच्या दोन्ही संघांना कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. महिला हॉकीच्या उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 0-1 ने पराभव झालेल्या भारतीय महिला संघाचा कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडकडून 0-6 असा मानहानीकारक पराभव झाला. तर पुरुष हॉकी संघाला इंग्लंडविरुद्ध 1-2 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयामुळे इंग्लंडच्या पुरुष संघाने गटसाखळीतील पराभवाची परतफेड केली. पुरुषांच्या सामन्यात इंग्लंडकडून सॅम वॉर्डने सातव्या व 43व्या मिनिटाला गोल केले. तर भारताकडून वरुण कुमारने 27व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

त्याआधी कांस्यपदकासाठी भारतीय महिला संघाचा सामना इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध झाला. इंग्लंडच्या संघाने सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. त्यातच वंदना कटारियाला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्यामुळे भारताचा बचाव तोकडा पडला. इंग्लंडच्या सोफी ग्रे हिने तीन गोल नोंदवले, तर लॉरा अन्स्वोर्थ, होली पिअर्ने-वेब व कर्णधार ऍलेक्‍झांड्रा डॅन्सन यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवताना इंग्लंडला एकतर्फी विजय मिळवून देत साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढला.राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या ब गटातील साखळी सामन्यात भारताने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला होता. पण कांस्यापदकासाठी झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याने सलग तिसऱ्या वेळी भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतून रिकाम्या हाती परतावे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)