पुरुष नसलेलं गाव…

वृत्तपत्रे अथवा सोशल मीडियात सातत्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झालेल्या दिसतात. या बातम्यांचे विश्‍लेषण करताना एक मुख्य मुद्दा असतो तो पुरुषप्रधान मानसिकतेचा! पुरुषी वर्चस्वाला हजारो वर्षांची परंपरा आहे. या वर्चस्ववादी विचारातूनच स्रियांकडे एक उपभोग्य वस्तू मानले जाते. वर्षानुवर्षांपासून या मानसिकतेतून होत आलेले अन्याय-अत्याचार-शोषण पाहिले की पुरुषी मनमानी नसलेले जगात एकही स्थान नाही का, असा प्रश्‍न पडतो. मात्र, असे एक ठिकाण असून ते केनिया या देशात आहे. आजपर्यंत तुम्ही कधी ऐकले किंवा वाचले नसणार की, असेही एक गाव आहे की तेथे पुरुषी मनमानी होण्याचा प्रश्‍नच येत नाही. हे गाव केनियात असून “उमोजा’ असे त्याचे नाव. या गावात पुरुषांना “नो एंट्री’ (प्रवेश बंदी) आहे.

“उमोजा’ या केनियन गावात सध्या 50 महिला आणि सुमारे 200 लहान मुले राहतात. हे लोक पुरुषांच्या उपस्थितीविना राहतात. पितृसत्ताक समाजाविना “उमोजी’तील महिला व मुले आरामात जीवन व्यतित करत आहेत. आपल्यासोबत काहीच वाईट होत नाही, याचे त्यांना समाधान वाटते. “उमोजी’ अस्तित्वात येण्याची कहाणी जरा दुर्देैवीच आहे. 1990 मध्ये लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या महिलांनी हे गाव वसवले होते. म्हणजे घरातील अत्याचार, बालविवाह व लैंगिक अत्याचारातून वाचलेल्या महिलांचे हे गाव आहे. अनेक वेळा गावातील महिलांवर दबाव आणण्यात आला. मात्र, त्या पुरुषांच्या “नो एंट्री’वर ठाम राहिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)