पुरुष दुहेरीत माईक ब्रायन-जॅक सॉक जोडी विजेती 

पुरुष दुहेरीत माईक ब्रायन आणि जॅक सॉक या अमेरिकेच्या तृतीय मानांकित जोडीने विजेतेपदाचा मान मिळविला. ब्रायन-सॉक जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात पोलंडचा लुकास कुबोट व ब्राझिलचा मार्सेलो मेलो या सातव्या मानांकित जोडीचा प्रतिकार 6-3, 6-1 असा सहज मोडून काढत विजेतेपदाची निश्‍चिती केली.
दरम्यान ऍश्‍ले बार्टी व कोको वान्डेवेघे या 13व्या मानांकित जोडीने बार्बरा क्रॅचिकोव्हा आणि कॅटरिना सिनियाकोव्हा या अग्रमानांकित जोडीवर 6-4, 7-6 अशी सरळ सेटमध्ये सनसनाटी मात करताना महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
विजेतेपदासाठी त्यांच्यासमोर तिमिया बाबोस व क्रिस्टिना लाडेनोविच या द्वितीय मानांकित जोडीचे आव्हान आहे. बाबोस-लाडेनोविच जोडीने उपान्त्य लढतीत समंथा स्टोसूर व शुआई झेंग या बिगरमानांकित जोडीला 6-4, 7-6 असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)