“पुरुषोत्तम’मध्ये ज्वलंत विषयावर एकांकिकेचे सादरीकरण

पुणे – मोबाईलचे जडलेले व्यसन, त्यामुळे हरवत चाललेले भान, सदैव मोबाईलमध्ये व्यस्त असलेला मुलगा आई-वडिलांवर हात उचलतो. मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या या मुलाला त्याची आई मोबाईल संभाषणातून कशी बाहेर काढते. या विषयावर आधारित “कॉर्नर’ही एकांकिका पीएईस मॉर्डन अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केली.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सद्याच्या ज्वलंत विषयावर एकांकीका सादर करण्यात आल्या. तंत्रज्ञानाच्या युगात मानव वेगवेगळ्या क्षेत्रांत नवनवे शोध लावत असतात. असाच एक शेतकरी 9 जातीच्या तांदळाचा शोध लावतो. मात्र, हे उत्पादन कंपनीला विकल्यावर त्यांचा फायदा होणार आणि शेतकऱ्याचा नाही; म्हणून शेतकरी कोणतेच पेटंट विकत घेत नाही. अशावेळी शेतकऱ्याला कोणीही पैशांची मदत करत नाही. या कथेवर आधारित “प्रयोग दहावा’ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केला.

सद्या प्रसारमाध्यमे बातमीची सत्यता न पडताळ “ब्रेकिंग न्यूूज’ला महत्त्व देतात. त्याकथेवर आधारित “ब्रेकिंग न्यूज’ही एकांकिका सादर करण्यात आली. अंधश्रद्धा ही श्रद्धेतूनच निर्माण होत असते. मात्र, या श्रद्धेच्या मुळाशी नेहमी विज्ञान असते. या आशयावर खडकीतील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाने “मरीआईचा गाडा’ ही एकांकिका सादर केली.

पाकिस्तानकडून अणुबॉम्बची चाचणी करण्यात आली, तेव्हा ती सिद्ध करण्यासाठी भारताच्या गुप्तचर यंत्रणेने पुरावे शोधायला सुरवात केली. पुरावे मिळण्याच्या वाटेवर असतानाच पंतप्रधानांकडून ते थांबवण्यात आले. त्यावेळी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या भावना या “लास्ट सिप’ एकांकिकेतून मांडण्यात आल्या. सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, कोंढवा महाविद्यालयाने ती सादर केली.

गावातील तरुण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी व्हॉट्‌स अॅॅप, फेसबुकवर व्हायरल होणारे मॅसेजचा वापर करतात. राजकीय अस्तित्वासाठी त्या पुढाराच्या म्हणण्यानुसार काम करतात. मात्र, हे पुढारी स्वतःच्या फायद्यासाठी या तरुणांचा वापर करतात. या आशयाची “व्हायरल’ ही एकांकिका न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर या महाविद्यालयाने सादर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)