पुरातत्त्व अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांचे निधन

पुणे – भारतीय पुरातत्त्व विद्येचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मधुकर केशव ऊर्फ म. के. ढवळीकर (वय 87) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी 7 ते 9 या वेळेत ढवळीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मयूर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. ढवळीकर यांचा जन्म 16 मे 1930 रोजी पाटण येथे झाला. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयातून बी. ए. आणि एम. ए. केल्यानंतर त्यांनी पुरातत्त्वशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त केली. रॉयल एशियाटिक सोसायटी आणि रवींद्रनाथ टागोर शिष्यवृत्तीचे मानकरी ठरलेल्या ढवळीकर यांना 2011 मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची द आर्यन्स : मिथ अँड आर्किओलॉजी, आर्किओलॉजी ऑफ वेस्टर्न इंडिया, एन्व्हायर्नमेंट अँड कल्चर : ए हिस्टोरिकल परसेक्‍टिव्ह, कल्चरल इम्प्रेरेलिझम : इंड्‌स सिव्हिलायझेशन इन वेस्टर्न इंडिया, द फर्स्ट फार्मर्स ऑफ डेक्कन, इनामगाव येथील उत्खनन, लेट हिनायनन केव्हज ऑफ वेस्टर्न इंडिया ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. गणेशा : द हिंदू लॉर्ड हे वेगवेगळ्या ठिकाणच्या गणपतींवर त्यांनी संशोधनपर लिहिलेले पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)