पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सर्वतोपरी सहकार्य : ना. रामराजे

फलटण ः ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांचे समवेत महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाण, सुरेश येवले, बापुराव जगताप, दादा जाधव, विश्‍वनाथ शिंदे, गोविंदराव शिंदे व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य.

फलटण, दि. 13 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने गौरव केलेल्या दलित मित्र व समाज भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मागण्या रास्त असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्‍वासन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच ना. रामराजे यांची फलटण येथील निवासस्थानी भेट घेवून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर ना. रामराजे यांनी वरील आश्‍वासन उपस्थितांना दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाण (पुणे) यांनी शासनाने यापूर्वी मान्य केल्याप्रमाणे समाजभूषण, दलितमित्र पुरस्कार प्राप्त मान्यवरांना दरमहा प्रत्येकी मानधन तात्काळ सुरु करावे. तसेच सर्व दलितमित्र व समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांना राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या एस.टी.बसच्या सवलतीप्रमाणे शिवनेरी, शिवशाही या बसेसमधूनही एका साथीदारासह मोफत प्रवासाची सवलत मिळावी, या प्रमुख मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश येवले, उपाध्यक्ष बापुराव जगताप, दादा जाधव, विश्‍वनाथ शिंदे, गोविंदराव शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)